*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज येथील विधीज्ञ ॲड.शब्बीर हजरत जमादार यांची संपूर्ण महाराष्ट्रात नोटरी म्हणून सराव करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र विधी व न्याय मंत्रालयाचे, कायदेशीर व्यवहार विभागाचे ,उपविधी सल्लागार नवी दिल्ली चे "जसपाल सिंह भंजू यांनी डिजिटल स्वाक्षरी करून आज दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:४६:५८ वा. नियुक्ती केल्याचे पत्र दिले
याबाबत या प्रमाणपत्रात दिलेली माहिती अशी की
हे प्रमाणित करण्यासाठी आहे की श्री. शब्बीर हजरत जमादार हा हजरत अहमद जमादार यांचा मुलगा राऊतनगर, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर पिन 413101 ची नोटरी कायदा 1952 (1952 चा 53) अंतर्गत नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नोटरी म्हणून सराव करण्यासाठी अधिकृत आहे. दिनांक ०१/०४/२०२५ रोजी माझ्या हाताखाली व शासनाच्या शिक्का खाली दिले. आहे असे.
ॲड. शब्बीर हजरत जमादार हे सन १९९१ पासून महाराष्ट्रातील माळशिरस पंढरपूर सोलापूर इंदापूर बारामती पुणे अशा विविध न्यायालयात वकिली केली असून त्यांची नोटरी पदी निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा