*ज्येष्ठ पत्रकार-- बी .टी.शिवशरण.- श्रीपूर*
श्रीपूर येथील जागृती तरुण मंडळ यांचे वतीने शिवजयंती व गुढी पाडवा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे सोलापूर दैनिक लोकमत आवृत्तीचे संपादक सचिन जवळकोटे यांचे शुभहस्ते सदर नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत रामचंद्र सावंत पाटील संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अँड प्रकाशराव पाटील संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना दिनकर बेंबळकर जनरल मॅनेजर ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसटलरी श्रीपूर व महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ लक्ष्मी अशोक चव्हाण उपस्थित रहाणार आहेत
या मंडळाचे वतीने भव्य महिला भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हनुमान मंदिर श्रीपूर मध्ये होणार आहे या कार्यक्रमात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी साहेब यांनी या कारखान्यास अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय सन्मान पुरस्कार प्राप्त करून देण्यात मोठे योगदान दिले आहे तसेच कारखाना उत्तम स्थितीत आणून योग्य नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले आहे त्यामुळे उद्योग शेती सहकार व त्यांवर पुरक व्यवसाय यांची भरभराट होण्यास मदत झाली आहे डॉ यशवंतराव कुलकर्णी साहेब हे सौंदर्यवादी दृष्टिकोन असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात ते बहुचर्चित सर्व विषयांत पारंगत अधिकारी आहेत खेळ वाचन वक्तृत्व तसेच अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात आपला ठसा उमटवला आहे बदलत्या काळानुसार अनेक संकल्पना ते प्रत्यक्षात येथे राबवत असतात ते जेथे लक्ष घालतात तेथे ते कायाकल्प करतात ते शिस्तप्रिय अधिकारी आहेत कर्तव्य कठोर अधिकारी असल्याने त्यांचेकडे चुकीला माफी नाही जे करायचे ते कर्तव्य जबाबदारी म्हणून प्रामाणिक पणाने केले पाहिजे हे त्यांचे ब्रिद आहे डॉ यशवंतराव कुलकर्णी साहेब यांनी कारखान्याचा पदभार स्वीकारल्यानंतर कारखान्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणला आहे कारखान्याचा कायापालट केला आहे स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या आदर्श मार्गक्रमण व सुसंस्कारीत शिकवण या तत्वावर ते चालत आहेत कारखान्याचे कर्मचारी अधिकारी यांचे जिवनात सकारात्मक व सुसंस्कृत बदल घडवून आणण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात त्यांच्या आरोग्याची काळजी बाबत नेहमी आरोग्य शिबीर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन कार्यक्रम या बरोबरच कर्मचारी अधिकारी यांच्या हुशार गुणवंत मुलांना मार्गदर्शन सहकार्य या बाबत ते जागरूक असतात कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी श्रीपूर मध्ये कारखान्याचे वतीने प्रशांत क्रिडा महोत्सव या लोकप्रिय महोत्सवाचे ते संस्थापक आधारस्तंभ आहेत जे करायचे ते चांगले व आदरयुक्त व लक्षात राहील असे झाले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष राहिला आहे ते मेहनती आहेत शिस्त वेळ जबाबदारी याला ते प्राधान्य देतात अशा या लोकप्रिय बहुचर्चित अधिकारी म्हणून कायम ओळखले जाणारे डॉ यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा श्रीपूर मधील आदर्श मंडळ म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक व ख्याती असलेल्या जागृती तरुण मंडळाच्या वतीने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाकडे श्रीपूर महाळुंग बोरगाव व परिसरातील जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा