*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज ,ॲग्रोवन पेपर, हायजेनिक अग्रो व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने केळी पिक व्यवस्थापन कार्यशाळा कृषी उत्पन्न बाजार समिती अकलुज येथे मदनसिंह शंकराव मोहिते पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांचे प्रमुख उपस्थित दिनांक 26 एप्रिल रोजी पंचक्रोशीतील 250 केळी उत्पादक शेतकरी पदाधिकारी यांच्या सहभागासह कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे माननीय मदन सिंह मोहिते पाटील यांनी उपस्थितितांना सर्वप्रथम विविध वक्तत्याचे तज्ञांचे मार्गदर्शन ग्रहण करण्याचे आव्हान केले व आपल्या मार्गदर्शनामध्ये कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्याचे बाबत सल्ला दिला . भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी बांधवांना सर्व पिकांच्या मार्गदर्शन, शिबिर, प्रदर्शन बाबत सर्वतोपरी सहकार्य करेल याची ग्वाही दिली .कार्यक्रमांमध्ये कृषी भूषण सोमनाथ हुलगे यांनी उत्पादन वाढीसाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे अहवान केले व केळी लागवड तंत्रज्ञान सोप्या भाषेत उपस्थित लोकांना अवगत करून दिले .केळी उत्पादक व केळी निर्यातदार श्री किरण डोके यांनी केळी दर्जात्मक व निर्यातक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले केळी निर्यात वाव संधी बाबत माहिती दिली .स्वप्निल सूर्यवंशी मॅनेजिंग डायरेक्टर हायजोनिक अग्रो लिमिटेड यांनी केळीचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व त्यांच्या दर्जात्मक उत्पादनाची माहिती दिली आणि भविष्यातील केळी बाबत ए आय तंत्रज्ञानाचा वापर बाबतची दिशा बाबत माहिती दिली .सेवारत्न - सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी अकलूज ISO9001 :2015 यांनी केळी पिकाविषयी केंद्र व राज्य पुरस्कृत योजना मधील संधी व वाव व सहभाग बाबत उपस्थितांना माहिती दिली
कृषी मित्र श्री सुदर्शन सुतार ॲग्रोवन जिल्हा प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून २० वर्षपूर्ती ॲग्रोवन वाटचाल व दिशा बाबत उपस्थितांना माहिती दिली .कार्यक्रमाचे नेटके संयोजन, आयोजन ,नियोजन व अंमलबजावणी बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी कर्मचारी तसेच संदेश कुलकर्णी सीनियर एक्झिक्यूटिव्ह ॲग्रोवन, सागर देशमुख एरिया मॅनेजर हायजॉलिक ऍग्रो सोलापूर व राहुल शेळके कृषी पर्यवेक्षक अकलूज यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाची सांगता उपस्थित शेतकरी बाधव प्रश्न त्याची उत्तरे व उत्कृष्ट केळी दर्जात्मक विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी यांच्या सत्कार आणि चहापाणी झाली .सरते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेंद्र काकडे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांनी केली व शिबीराची सांगता झाली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा