*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
----- बावडा येथील सर्वसामान्य गोरगरीबांचे आधारस्तंभ डॉ. प्रवीण नेमचंद दोशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७३ वर्षे होते. त्यांचा पश्चात पत्नी प्रणया दोशी, मुलगा डॉ. इंद्रजीत दोशी, सुन प्रियंका दोशी असा परिवार आहे.
डॉ. प्रवीण नेमचंद दोशी यांनी बावडा सारख्या ग्रामीण भागात ४५ वर्षांपूर्वी सेवेला सुरूवात केली. त्यांनी सर्वसामान्य गोरगरीबांचा मसिहा म्हणून ओळख निर्माण केली. तसेच शेकडो गरोदर मातांची नैसर्गिक प्रसूती करून वेळ व पैशांची बचत केली. त्यांना सर्वसामान्यांचा कैवारी व मसिहा म्हणूनच ओळखले जायचे.
त्यांना अभयकुमार दोशी, धन्यकुमार दोशी, शांतीलाल दोशी, डॉक्टर श्रेणिक दोशी
असे पाच भाऊ होते. त्यांनी त्यांच्या कुटूंबात पाच डॉक्टर बनवले. त्यामध्ये त्यांचा मुलगा डॉ. इंद्रजीत दोशी (MBBS, DMRE (RADIOLOGIST) यांचा समावेश आहे.
डॉ. प्रवीण नेमचंद दोशी दररोजच्या दिनचर्या प्रमाणे सकाळी देवदर्शन करून घरात नाष्टा घेतला त्याच वेळेस त्यांना छातीत कळ मारत असल्याचे जाणवल्याने घरातीलच डॉक्टरांना बोलावून प्राथमिक उपचार केले. परंतू पुढील उपचारासाठी अकलूजला घेवून जाताना त्यांना ह्रदयविकाराचा मोठा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
फोटो -डॉ. प्रवीण नेमचंद दोशी
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा