*माळशिरस तालुका प्रतिनिधी*
*रशिदभाई शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
चांदापुरी (ता.माळशिरस) येथील हद्दीत असणाऱ्या जुना नष्टे डीपी वरून याकुब दादाखान पठाण यांच्या गट क्रमांक 260-2 अ -1या शेतामधुन आलेले विद्युत पोल पुर्णपणे वाकले असल्याने सदरचे विद्युत पोल कधीही कोसळुन शकतात. आसपासच्या शेतकय्रांचे ऊस पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत.विद्युत पोल कोसळल्यास पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे.या परिसरात जनावरे वगैरे चरण्यासाठी शेतकरी घेवून जात असतात. विद्युत तारेचा शाॅक बसुन अपघाती जिवितहानी होवु शकते.त्यामुळे विज विद्युत कंपनीच्या अधिकाय्रांनी वेळीच ठोस पावले उचलून वाकलेले विद्युत पोल सरळ करून संबंधित शेतकय्रांच्या समस्येची त्वरित सोडवणूक करावी. अशी मागणी करण्यात येत आहे.विज विद्युत कंपनी गांभीर्याने घेणार कि डोळेझाक करणार असे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा