*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर
सोलापूर : सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली असून शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बाजार पोलिसातील सूत्रांनी याला दुजारा दिला आहे.
अशी माहिती मिळत आहे की, डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे त्या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टर वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा