*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
-----पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण दशरथ माने व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी गुरुवारी (दि. १०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. प्रवीण माने आणि मयूरसिंह पाटील यांनी - मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने दोघेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रविण माने यांनी शाल व शंकराची मूर्ती भेट देवून सत्कार केला. प्रवीण माने व त्यांचा गट भारतीय जनता पार्टीसोबत आल्यास निश्चितपणे भाजपची ताकद वाढणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू झाली आहे. प्रवीण माने यांना भारतीय जनता पार्टीत घेण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल हे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
प्रवीण माने यांचे तालुकाभर संबंध असून, त्यांच्या पाठीशी सोनाई परिवार खंबीर असल्याने तालुक्यात येणारी प्रत्येक निवडणूक ते पक्ष वाढीसाठी ताकतीने कार्यकर्त्यांच्या जिवावर लढू शकतात. आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती, नगरपरिषद व इतर निवडणुकात भारतीय जनता पार्टीला इंदापूर तालुक्यामध्ये प्रवीण माने यांच्या रूपाने मोठी राजकीय ताकद मिळणार आहे. मागील विधानसभा निवडणूकीत जवळपास ४० हजार मतांचा एक गठ्ठा मते प्रविण माने यांच्याकडे असल्याने ते भाजपमध्ये जातील अशी अटकळ तालुक्यामध्ये बांधली जात आहे. दरम्यान,
यापूर्व प्रविण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट नरसिंहपूर येथे घेवून त्यांचा सन्मान केला होता. तसेच विधानसभा निवडणुकी नंतर मंत्रालयातही भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच त्यांना भाजपात प्रवेश देवून इंदापूर तालुक्यात भाजपाची ताकत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा