*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
आपण अनेकांचे सामुदायिक विवाह सोहळे पाहिले परंतु एक जून हे शासकीय जन्मतारीख असते महाराष्ट्रभरातून बऱ्याच लोकांचे वाढदिवस हे एक जून असतात शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे पाटील यांनी आपल्या गावातील वयोवृद्ध आणि तरुण या सर्वांचा एकत्र सामुदायिक वाढदिवस साजरा करण्याचे ठरवलेले आहे .
यावेळी बोलताना खूपसे पाटील म्हणाले की ,अनेक गरीब लोक असे आहेत की ,ज्यांचा वाढदिवस साजरा केला जात नाही. तरुण मुलाचा वाढदिवस साजरा केला जातो . नेत्याचा वाढदिवस साजरा केला जातो ,अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला जातो, परंतु वयोवृद्ध शेतकऱ्याचा वाढदिवस साजरा केला जात नाही. जो राब राब कष्ट करतो , रात्रंदिवस आपल्या संसारासाठी , प्रपंचासाठी काबाडकष्ट उपसणारा शेतकरी ज्याचं वय 60 वर्ष आहे ,70 वर्ष आहे , अशा व्यक्तीचा आयुष्यभरात कधीही वाढदिवस साजरा झाला नाही , म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपळवाटे गावी अतुल खूपसे मित्र मंडळातर्फे 100 हून जास्त लोकांचे म्हणजे उपळवाटे गावात जेवढ्या लोकांचे एक जूनला वाढदिवस आहेत , तेवढ्या लोकांचे वाढदिवस साजरा करण्याचे ठरवलेला आहे. यासाठी 100 जणांत एकच भला मोठा केक असणार आहे. आणि सर्व जणांचा केक कापण्याचा म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचा एकाच वेळेस वेळ असणार आहे. तसेच वृक्षारोपण , रक्तदान , एकाच मुलीवर ऑपरेशन असे वेगवेगळे उपक्रम यानिमित्ताने उपळवाटे गावी असणार आहेत .तसेच जेवणाची सोय पण केली जाणार आहे.
हा सर्व कार्यक्रम अतुल खूपसे पाटील मित्र मंडळातर्फे राबवला जाणार आहे . एकाशेतकऱ्याला शाब्बासकीची थाप म्हणून असा हा अनोखा उपक्रम पाहायला मिळणार आहे .यानिमित्ताने एवढेच होते की , सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर सामुदायिक वाढदिवस ही जिल्ह्यातील उपळवाटे पहिले गाव असेल यात शंकाच नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा