Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ मे, २०२५

*माळशिरस (अक्षता मंगल कार्यालय 61 फाटा ) येथे आमदार-- उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत 26 मे रोजी आमसभेचे आयोजन*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

सोमवार, २६ मे रोजी सकाळी १० वाजता, अक्षता मंगल कार्यालय, ६१ फाटा येथे माळशिरस तालुक्याची आमसभा संपन्न होणार आहे.

       या आमसभेस

 विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, तालुक्यातील सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शासकीय सेवा व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तमराव जानकर यांनी राबवलेला हा उपक्रम लोकशाहीतील उत्तरदायित्व आणि संवेदनशीलतेचे प्रतीक मानला जात आहे.

आमसभेच्या निमित्ताने उत्तमराव जानकर यांनी पुन्हा एकदा आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीची प्रचिती घडवली आहे. त्यांनी

स्वतः पुढाकार घेऊन तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, जेष्ठ नागरिक, महिला, अपंग, कामगार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी आणण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांच्या नेतृत्वात आयोजित होणारी ही सभा म्हणजे जनतेच्या दारात प्रशासन पोहोचवण्याचे ज्वलंत उदाहरण ठरणार आहे. आमसभेत नागरिकांच्या समस्या, शेतीविषयक अडचणी, शासकीय योजनांचे लाभ, जमीन मोजणी, उत्पन्न प्रमाणपत्रे, अपंग सवलती, महिला बचत गटांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, पाणी व वीजपुरवठा यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींचे निवारण केले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या अडचणींसह आवश्यक कागदपत्रे घेऊन आमसभेस उपस्थित राहावे.

असेही आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा