Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ मे, २०२५

*या चिमण्यांनो परत फिरा रे.... घराकडे आपल्या....*

 


*वृत्तपत्र छायाचित्रकार ---संजयभाऊ लोहकरे

या चिमण्यांनो परत फिरा रे...घराकडे अपुल्या... जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या...!*


वरील छायाचित्र पाहिल्यानंतर भारतरत्न तथा भारताच्या गानसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांचे मराठी भावगीताची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.आई म्हणजे ममता,प्रेम,माया याचे प्रतिक असते.ती आई मुलांची असो अथवा पशुपक्षांच्या पिल्लांची असो आपल्या मुलांवर सतत प्रेम करत असते.मुले ही आई कुठे ही बाहेर गेली तर लहान मुले दरवाज्याकडे आईची वाट बघत असतात.अकलूज येथील रामबाग गृह संकुलामध्ये सौ.भाग्यश्री लोहकरे यांच्या परसबागेत बुलबल पक्षांची पिल्ले घरट्यात बसून आपल्या आईची वाट बघत असतानाचे छायाचित्र टिपले आहे वृत्तपत्रछायाचित्रकार संजय लोहकरे,अकलूज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा