*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील बी.फार्मसी कॉलेजच्या आवारात अनेक पक्षी वास्तव्यास आहेत.आज एक कबूतराचे पिल्लू एका ठिकाणी निवांत बसून होते. त्याच्या शरीराची हालचाल संपुर्ण थांबत आली होती.एका ठिकाणी निस्तब्ध बसून आयुष्याची शेवटची घटका मोजत बसले होते.हे प्राचार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपले सहकारी दत्तात्रय कोळी सर व प्रविण कांबळे यांना त्या कबूतराच्या पिल्लाला अकलूज येथील पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले.त्यांनी ही क्षणाचा विलंब न लावता त्या पिल्लाला अकलूज येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले.डॉक्टरांनी ताबडतोब उपचार केलेल्यामुळे कबूतराचे पिल्लू काही वेळात उपचाराला प्रतिसाद देत पुन्हा हवेत झेपावले.त्यामुळे आजचा दिवस काॅलेजमधील सर्वांसाठी आनंदाचा व सुखद धक्का देऊन गेला.
या वर्षी कडक उन्हाळा असल्यामुळे आजकाल पक्षांना सावलीचा सहारा मिळणे कठीण झाले आहे.पण अकलूजच्या फार्मसी कॉलेजच्या परिसरात व क्रीडा मैदानावर मोठ मोठी वृक्ष असल्यामुळे तेथे पशुपक्षी वास्तव्यास असतात. काॅलेजमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी नेहमी या पक्षांना आपल्या जेवणातील डब्यातील अन्न देत असतात.त्यामुळे मुलांना शिक्षणाबरोबर पक्षांचा किलबिलाट ऐकायची सवय झाली आहे.हे पक्षी काॅलेजचे कर्मचारी व विद्यार्थी यांच्या जीवनातील घटकच झाले आहे. पशुपक्षांवर दया करा या ब्रीदवाक्य प्रमाणे सर्वांनी मिळून एका कबूतराच्या पिल्लाचे प्राण आज वाचवले.यामुळे आजचा घडलेला प्रसंग व क्षण सर्वांच्या सदैव स्मरणात रहाणार ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा