Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ मे, २०२५

*चांदापुरी येथील प्रतापसिंह विद्यालयाचा दहावीचा निकाल 96.34 टक्के*

 

*माळशिरस तालुका --प्रतिनिधी*

  *रशीदभाई. शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परिक्षा प्रतापसिंह विद्यालय चांदापुरी चा 96.34% निकाल लागला असुन उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.व यामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.कु.प्रतिक्षा हनुमंत मगर 86.20%(प्रथम),कु. कीर्ती धुळाजी कोपनर 85.40 % (द्वितीय), कु. साक्षी मनेश जगदाळे 82.20% (तृतीय), तर कु. बुशरा मुसा पठाण 80.60%, कु. प्रांजली सरदार तरंगे 80.60% कु.श्रृतिका शिवाजी गोरवे 80% इ.विद्यार्थीनींनी उज्वल यश संपादन केले आहे.परीक्षेसाठी एकुण 82 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .या यशाबद्दल मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा