Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ मे, २०२५

शहीद जवान


कवीयत्री - नूरजहाँ शेख 

गणेशगाव ,ता. माळशिरस

    

देशाच्या या वीर सुपुत्राला

सलाम त्याच्या शौर्याला

देश माझा सुरक्षित करण्या

अर्पण त्याने केले देहाला !!


मातेने त्या लाल गमावला

तिरंग्यात देह लपेटून आला

पाहवेना बाप असा लेकराला

वीरमरण आले सौभग्याला !


जनसागर सारा हळहळला

वीर तो आज शहीद झाला

मातृभूमीच्या रक्षनार्थ त्याने

रक्ताचा थेंब नी थेंब वाहिला  


नेस्तनाबूत करण्या शत्रूला

सुरक्षित ठेवाया आम्हाला

शान वाढवाया तिरंग्याची          

पुत्र देशाचा कुर्बान झाला


हिम्मत मिळो त्या कुटुंबाला

दुःखातून या सवरण्याला 

नाही विसरणार देश सारा

वीरांच्या या बलिदानाला !!


सांगणे फक्त एकच माझे    

भारतभूच्या या जनतेला

देत रहावे सदैव सन्मान      

सैनिकांच्या परिवाराला !!




नूरजहाँ शेख

गणेशगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा