*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
भीमा नदीकाठच्या नागरिकांना प्रसिद्धी पत्रकार द्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून
मागील काही दिवसांपासून निरा खोरे व भीमा खो-यामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदयथितीत निरा नदीपात्रात लाटे येथे २६,५२५ क्युसेक्स इतका विसर्ग येत आहे. तसेच सदयस्थितीत भीमा नदीपात्रातील को. प. बंधा-यांमध्ये आधीपासूनच पाणीसाठा आहे. त्यामुळे सदयस्थितीतील विसर्ग पाहता भीमा नदीपात्रातील सर्व को. प. बंधा-यांवरून पाणी जाण्याची शक्यता आहे. तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देणेबाबत विनंती आहे.
हे आपले माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी ज्योती. वि.इंगवले उपकार्यकारी अधिकारी भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी पत्राद्वारे कळवले आहे
माहितीस्तव प्रत
मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांना माहितीसाठी सविनय सादर.
तहसिलदार, तहसिल कार्यालय, पंढरपूर / मंगळवेढा यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी.
सहायक अभियंता श्रेणी-१, भीमा विकास उपविभाग क्र. २, पंढरपूर यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी.
उपविभागीय अभियंता, भीमा विकास उपविभाग क्र. ४. श्रीपूर यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा