उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
क्रूर व्यवहार....हुंडा
माणूस माणुसकी विसरतोय
हिंस्त्र श्वापदापरी वागतोय
स्वराज्यात या सावित्रीच्या लेकीचा जीव हुंड्यासाठी पुन्हा पुन्हा जातोय !
पैसा पैसा पैसा करून माणूस माणुसकी विसरून हैवानापरी वागताना दिसतो आहे ,जग चंद्रावर गेले ,सावित्रीच्या लेकी सक्षम झाल्या ,सोफिया व्योमीका सारख्या वाघिणी हाती घेवून शस्त्र रणांगणात शत्रूचे मुडदे पाडत आहेत ,वाघिणी , रणरागिनींच्या देशात पुन्हा पुन्हा हुंड्या पायी लेकी बळी जात आहेत.
लग्न होवून नांदायला गेलेली लेक परक्याचं धन होते,दिल्या घरीच तिने जगावं आणि मरावं अशी समाज रीत आहे .स्वतःच अस्तित्व मिटवून संसार बाग फुलवत रहाणे हे प्रत्येक स्त्रिच्या स्वभावातच असते.स्वतःला ऍडजस्ट करीत परक्या लोकांना आपलेसे करण्यासाठी सदैव धपडत असते .
लग्नात भांडीकुंडी २ तोळे, ५ तोळे,१० तोळे, ५० तोळे दोन चाकी चार चाकीची भूक श्रीमंत आणि गरीब घरात ही दिसून येते , ' काय दिलं तुझ्या बापानं ' हा टोमणा जवळ जवळ सर्वच सूनाना ऐकायला मिळतो सून टोमणे खात आसू ढाळत दिवस ढकलते आणि पुन्हा तीच सून जेव्हा सासू बनते तेव्हा तीही असाच टोमणा तिच्या सुनेला देते आणि स्त्रीच स्त्रीची शत्रू होते ,ही परंपरा वर्षा नु वर्षे शतकानुशतके चालूच आहे .आजची स्त्री बहुतांश शिकलेली कमावती आहे. तरीही हुंडाबळी सारखे मानवतेला कलंक असणारे प्रकार वारं वार घडताना दिसत आहेत ,अजूनही मोठ्या फुशारकीने आई बाप मुलाला मिळालेला हुंडा वाढवून नातेवाईकांमध्ये कॉलर टाइट करून सांगतात ,ज्यांना कमी हुंडा मिळाला आहे त्यांना मग सुनेला टोमणे मारायला जागा मिळते ....त्याला बग किती हुंडा मिळाला ,तुला काय दिलं ....
हुंडा ही कुप्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे गरीब असो किंवा श्रीमंत असो लग्न ठरविताना आगोदर देण्या घेण्याचे बोलणे होते ,श्रीमंत बाप आपल्या लेकीला भरमसाठ सोने ,गाडी,प्लॉट च्या रूपाने हुंडा देतो आणि गरीब मुलीचा बाप हतबल होतो ,कर्ज काढून मुलीचे लग्न लावून देतो .सासरी मुलगी सुखी रहावी तिला कोणताही त्रास होवू नये ,तुझ्या बापाने हे नाही दिलं ,ते नाही दिलं असे टोमणे लाडक्या लेकीला मिळू नयेत म्हणून मुलीला हुंडा देतो राणी सारखे मुलीने मुलीने सासरी रहावे हीच अपेक्षा पित्याची असते,मुलीसाठी स्वतः कर्जबाजारी, भिकारी होतो , खरेतर बापाला भिकारी करून लेकीने लग्नाला तयारच नाही व्हायला पाहिजे .
अजूनही समाजात अनेक लेकी माहेरहून गाडी सोने, पैसे नाहीत आणले म्हणून सासरचा छळ गुपचूप सहन करत आहेत ,सासरच्यांनी सुनेच्या डोक्यात काठी मारून तिला रक्तबंबाळ केले तरी ती आई वडिलांना लेकीची काळजी वाटू नये ,आपला संसार मोडू नये म्हणून खरे कारण सांगत नाही किचन मधील डबा काढताना डोक्यावर पडला ,किंवा इतर काहीतरी कारण चौकशी करणाऱ्यांना सांगते आणि गुपचूप सर्व त्रास सहन करते अशा अजूनही अनेक वैष्णवी आहेत ज्या आई वडिलांना आपल्याला होणारा त्रास सांगून दुखवत नाहीत.याला संस्कार म्हणायचे की शोकांतिका हा प्रश्न पडतो . रीती रीवजाच्या आड लपलेल्या हुंडा रुपी भस्मासुराला समाजानेच वाढवले आहे .तो साहजा सहजी रीतिरिवाजातून हद्दपार होणार नाही,कायद्याचा बडगा उगारला तरी तो नष्ट होत नाही,त्याला आपला समाजच जिवंत ठेवतोय .
काही क्रूर निर्लज्ज माणसातील पाशवी वृत्ती वाढते स्वतः न कमावता बायको किंवा सुनेच्या घरच्यांकडून लुटायचे सहजा सहजी मिळाले तर ठीक नाहीतर मग त्रास देवून तिचा छळ करून वसुली करायची , अशा नीच प्रवृत्तीचे लोक समाजासाठी कलंक आहेत ,अशा आयतखावू लालची लोकांना खरेतर ठेचून काढले पाहिजे ,आज एक वैष्णवी बळी गेली आहे उद्या कोणीतरी आणखी एक वैष्णवी बळी जावू नये यासाठी अशा करिश्मा , सुशांत व राजेंद्र हगवणे सारख्या मानवी रूपातील राक्षसांना चपलेने मारीत धिंड काढून मग भर चौकात फाशी दिली पाहिजे तर आणि तरच भविष्यात वैष्णवी सारख्या बळी जाणाऱ्या लेकी सुना वाचतील .
नूरजहाँ फाकृद्दिन शेख
गणेशगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा