Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० मे, २०२५

"कर्तव्य – गरजूंना आधार देणारी चळवळ!"

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

"कर्तव्य – रुग्णांपासून रस्त्यावरील बेघरांपर्यंत, प्रत्येक वेदनेला उत्तर देणारा असा शांत आवाज म्हणजेच कर्तव्य फाऊंडेशन

     जिथं शब्द थांबतात, तिथं सेवा बोलते,

जिथं आशा मावळते, तिथं कर्तव्य उजळतं.

रक्तात नाही पण मनात वाहतो तो ध्यास,

कर्तव्य मेडिकल फाउंडेशन ही संस्था केवळ आरोग्यसेवा देणारी संस्था नसून, मानवी हक्क, गरजूंना आधार आणि समाज परिवर्तनाची चळवळ आहे.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. फैज सय्यद आणि उपाध्यक्ष डॉ. नम्रता इंगळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही वाटचाल आज 3००+ डॉक्टर्स आणि २००+ स्वयंसेवकांच्या सहभागाने महाराष्ट्र, दिल्ली व इतर भागांमध्ये कार्यरत आहे. खासकरून समाजातील सर्वात दुर्लक्षित व उपेक्षित घटकांसाठी कार्य करते –

रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक

कामगार वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे

कुपोषित बालकं व त्यांच्या मातांकरिता पोषण सल्ला

वाढत्या वयातील वृद्ध जे आधाराविना आहेत

अनाथ मुले, बेवारस व्यक्ती व बालमजुरीतून मुक्त झालेले किशोर या उपक्रमांतर्गत संस्था कार्य करते:मोफत आरोग्य तपासण्या, औषध वाटप, लसीकरण

कुपोषणाविरुद्ध पोषण वाटप मोहीमा – खिचडी, फळं, आणि आयर्न/कॅल्शियम सप्लिमेंट्स

गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना पोषण व आरोग्य मार्गदर्शन

शाळांमध्ये 'सुपोषण सत्रं' – पोषणाचं महत्त्व आणि आहार नियोजन

बालकांसाठी स्वच्छता व आरोग्य शिबिरे

कर्तव्य मेडिकल फाउंडेशन केवळ आरोग्यसेवेपुरतं मर्यादित नसून, आजच्या आणि उद्याच्या समाजासाठी आवश्यक अशा अनेक उपक्रमांतून समाज परिवर्तनाचा ध्यास घेत आहे.





विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व मार्गदर्शन:

शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन सत्रं

स्पर्धा परीक्षा व त्यांच्या व्यावसायिक कोर्सेसबाबत माहिती देण्याचेही काम करते

"ध्येय आणि दिशा" ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा

व्यसनमुक्ती व नवजीवनाची सुरुवात ,शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत स्तरावर व्यसनमुक्ती अभियान

समुपदेशन सत्रं, रुग्ण आणि कुटुंबीयांसाठी आधार

"स्वस्थ मन, सुंदर जीवन" कार्यक्रमाद्वारे नवचेतना

आदिवासी व ग्रामीण समाजासाठी आरोग्य जनजागृती , प्राथमिक आरोग्य, स्वच्छता आणि पोषणविषयक स्थानिक बोलीभाषांमध्ये जनजागृती 

कुपोषण, मातृत्व 

वंचित आणि वसतिगृहातील नागरिकांसाठी विशेष सेवा

मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

लसीकरण, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी

मानसिक आरोग्य व सल्ला

महिला सशक्तीकरण – प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत

महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वितरण

मासिक पाळीबाबत आरोग्य शिक्षण शिबिरं

किशोरवयीन मुलींना आत्मसन्मान व आरोग्य व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करते.

दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असणाऱ्या सर्व लोकांसाठी पुणे ते दिल्ली ट्रेन मध्ये मोफत आरोग्य सेवा बजावली 

. संस्थेला ‘संत मदर तेरेसा रयत राज्य गौरव पुरस्कार 2024’ प्राप्त झाला समाजसेवेसाठीचा उल्लेखनीय सन्मान

माणुसकी राज्यगौरव पुरस्कार 2024 प्राप्त

डॉ. फैज सय्यद यांचे

"सेवेला जात-पात नाही, गरीब-श्रीमंत नाही. गरज आहे, ती माणूस म्हणून वागण्याची."

डॉ. नम्रता इंगळे म्हणतात:

"प्रत्येक मुलाला पोषण, प्रत्येक महिलेला सन्मान, आणि प्रत्येक गरजवंताला आधार – हेच कर्तव्य फाउंडेशनचं ध्येय आहे."

कर्तव्य टीमचे प्रेरणादायी नेतृत्व- डॉ फैज सय्यद, डॉ नम्रता इंगळे, गौरव गायकवाड, आशुतोष खाडे ,डॉ गौतमी कोकरे, डॉ ऋतुजा शिंदे, डॉ वैष्णवी कांबळे,डॉ अमिषा सरवदे , डॉ निरव मेहता ,डॉ सोहेल खान, डॉ शांताराम हिचकड, डॉ साहिल पटेल, डॉ दीप बोरा, डॉ फोरम रावणी, अनिकेत मोगरे, डॉ ऋषिकेश पाटिल, डॉ यश थोरात, पूर्वा तांबट करतात

"आज एक हात पुढे केला, तर उद्या शंभर पावलं पुढं जातील .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा