*इक्बाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार -सांगली )*
*मो:-8983 587 160
गेल्या आठवड्यात *धामणी रोडवर* रस्त्यावर रात्री अचानक आलेल्या "बेवारस" मोकाट *घोड्यामुळे* अपघात झाला आणि *भट* नावाचे एक वाहनचालक *गंभीररित्या जखमी* झाले. डोक्यावर आपटल्याने त्यांच्या *मेंदूला* जबरदस्त मार लागला असून त्यांच्यावर तातडीने *शस्त्रक्रिया* केली असून त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
2 दिवसात त्यांना " *4 लाख* " रुपये खर्च आला आहे. याचपद्धतीने प्रत्येक आठवड्यात 4-5 अपघात सातत्याने होतं आहेत पण महापालिका *डोळ्यावर पट्टी* बांधून बसली आहे. *कोल्हापूर रोड* ,100फुटी रोड ,विश्रामबाग, तसेच धामणी रोडवर कर्नाटक येथील अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत.या अपघातांमुळे विनाकारण *आर्थिक भुर्दंड* सोसावा लागत असून संपूर्ण कुटुंबियांना "मानसिक त्रास" सहन करावा लागत आहे.
सांगली - मिरज रोडवर दिवसा तसेच *रात्री* अनेक मोकाट जनावरांमुळे अपघातांची मालिका सुरु असून "शेकडो वाहनचालक" जखमी झाले आहेत. ही मोकाट जनावरे कुणाची आहेत ??? याचे *मालक* कोण ??? त्यांच्यावर "कारवाई" कधी होणार ??? हा यक्ष प्रश्न आहे .
बेवारस जनावरांच्या वावरामुळे आज लोकांचा *जीव* जातं असून महापालिकेचे याकडे अजिबात लक्ष नाही.
वास्तविक इतके अपघात होतं असताना, कोणताही वाहनचालक अथवा सांगली -मिरजकर नागरिक महापालिका अथवा संबंधित विभागाकडे *तक्रार* करत नाही.
*नरो वा कुंजरो*"..या उक्तीनुसार मला काय करायचं ??? या विचाधारेनुसार कोणीही "जाब" विचारत नाही. कोण *मेले* किंवा जखमी झाले ..याचे कोणालाही सोयरसुतक नाही.
*नूतन महापालिका आयुक्तांनी* या महत्वाच्या विषयाकडे गांभीर्याने पाहत मोकाट घोडे ,बैल ,गाई, गाढव *जप्त* करावेत .त्याशिवाय मोकाट जनावर असणाऱ्या मालकांविरुद्ध कडक *कारवाई* करत,आर्थिक दंड वसूल करावा.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा