*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तहसीलदार धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा कळंब परंडा वाशी भुम या तहसील अंतर्गत सर्व रास्त भाव दुकानांचे प्राधिकरण व नूतनीकरण करून घ्यावे असे आदेश धाराशिव जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी वरील सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना दिली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते कि, शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2002 अन्वये रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र दर तीन वर्षानी नुतणीकरण करून घेणे हे रास्तभाव दुकानदार यांचेवर बंधनकारक आहे तथापि या कार्यालयाचे अभिलेखाचे अवलोकन करता बरेच रास्तभाव दुकानदार यांचे प्राधिकारपत्र कोणत्याही कारणाशिवाय नुतणीकरण अद्यापही करण्यात आलेले नाही. सदरची बाब निश्चितच खेदजनक व गंभीर स्वरूपाची आहे.
तरी याद्वारे आपणास पुनःश्च कळविण्यात येते कि, ज्या रास्तभाव दुकानदार यांचे प्राधिकपत्राचे नुतणीकरण अद्याप झालेले नाही अशा रास्तभाव दुकानदार यांचेकडून प्राधिकारपत्राची अनामत रक्कम रक्कम जप्त करण्यात येवून आज रोजीपर्यंत प्रतीदिन 1 रु प्रमाणे दंडाची रक्कम चलनद्वारे भरून घेवून प्राधिकारपत्र व चलनाची प्रत या कार्यालयास 3 दिवसाचे आत या कार्यालयास सादर करावी. प्रकरणात प्राधिकारपत्राचे नुतणीकरण केलेले नसताना रास्तभाव दुकानदार यांना धान्य वितरीत केल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी.
प्रत : उपविभागीय अधिकारी धाराशिव भुम कळंब उमरगा यांना माहीती व योग्य त्या कार्यवाहीस्तव
(श्रीमती स्वाती शेंडे) जिल्हा पुरवठा अधिकारी, धाराशिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा