उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्यच्या सहसचिव व फातिमा शेख प्रथम संमेलनाध्यक्ष , ईखलास रमजान अंकाच्या संपादक तसेच स्पंदन बहुभाषिक त्रैमासिकाच्या उपसंपादक अनिसा सिकंदर शेख या यांच्या संवाद हृदयाशी या कविता संग्रहाला कालकथित ज्योत्स्ना देवेंद्र गावंडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असल्याचे कवी चंद्रकांत जोगदंड यांनी पत्राद्वारे नुकतेच कळविले आहे. वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते ८ जून रोजी पुणे येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. अनिसा सिकंदर शेख यांची मिठू बालकथा ब्रेल लिपीत अनुवादित झाली आहे .त्याची काव्य पथिक हिंदी काव्यसंग्रह बालतरंग बालकवितासंग्रह ,सांगाती चारोळी काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातीमाबी शेख यांच्यावर प्रातिनिधिक कविता संग्रह संपादित केला आहे त्यांच्या बालकविता संग्रहास राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळाले आहेत . संवाद हृदयाशी या कवितासंग्रहाचा हा पहिलाच पुरस्कार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा