*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
----- पुणे ग्रामीणचे नुतन पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले व नुतन पोलिस स्टेशनला भेट देवून पाहणी केली.
पुणे ग्रामीणचे नुतन पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या समवेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक बारामती गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती डॉ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जिवन मोहिते, शंकर राऊत उपस्थित होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त अभय वांकर, प्रसाद दंडवते, संतोष मोरे, नाथाजी मोहिते, नितीन सरवदे, सचिन कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
नरसिंहपूर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंहास नुतन पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी भेट देऊन दर्शन घेतले. मंदिराच्या वतीने विश्वस्त अभय वांकर व प्रसाद दंडवते यांनी त्यांना शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच मंदिराचे पुरातन काळापासूनचे महात्म व मंदिराच्या सद्य स्थितीची माहिती दिली.
नरसिंहपूर येथील नुतन पोलिस स्टेशनला संदिपसिंह गिल यांनी भेट देवून इमारतीची पाहणी केली. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक त्या बाबींची आवश्यकता व त्याच्या पुर्तते संदर्भात सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नरसिंहपूर ग्रामपंचायतीच्या वतीने नितीन सरवदे, नाथाजी मोहिते, सचिन कदम, संतोष मोरे यांनी शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.
फोटो - नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात दर्शन घेतले नंतर पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल व मान्यवर दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा