*परंडा तालुका --प्रतिनिधी*
*हनुमंत मस्तुद*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
परंडा तालुक्यातील पांढरेवाडी गावचे सुपुत्र विनोद पवार हे धाराशिव येथे सप्टेंबर 2010 ला जॉईन झाले आणि नाशिक मध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर जम्मू काश्मीर , अरुणाचल , पंजाब , श्रीनगर देशसेवा केली राजस्थान , अमृतसर येथे कार्यरत असताना दिनांक 15/ 5 /2025 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
दिनांक 17/ 5 / 2025 रोजी त्यांच्या मूळ गावी पांढरेवाडी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले.
व अंत्यदर्शनासाठी सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढून पार्थिव विनोद पवार यांच्या शेतामध्ये आणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा सैनिक बोर्डाच्या कर्नल पांढरे साहेब आणि भूम परंडा वाशी तालुक्यातील आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्प वृष्टी आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीद विनोद पवार अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम विनोद पवार अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या मानवंदना देऊन पोलिसांच्या ताफा कडून हवेत फायर करून सलामी देण्यात आली .
यावेळी परंडा तालुक्याचे तहसीलदार निलेश काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ आंबी पोलीस स्टेशनचे गोरक्ष खरड . माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनाजी सावंत , नवनाथ जगताप परंडा तालुक्यातील कार्यकर्ते मान्यवर पांढरेवाडी गावचे सरपंच आणि ग्रामस्थ लहान थोर मित्र मंडळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा