Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ मे, २०२५

*सहकार महर्षी कारखाना गळीत मधील ऊस तोडणी वाहतूक वाट खर्ची व डिपॉझिट रक्कम तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे खात्यावर वर्ग*

 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२४-२५ मधील ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची ऊस तोडणी वाहतूक वाटखर्ची व डिपॉझीट रक्कम आदा करणेत आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.

        कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये सभासद,बिगर सभासद,दिर्घमुदत करारदार यांच्या गळीतास आलेल्या ऊसाची बिले शासनाच्या धोरणानुसार ज्या-त्या पंधरवड्यामध्ये त्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आली आहेत.तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची ऊस तोडणी वाहतूकीची संपुर्ण बिले दि.२२ मार्च २०२५ रोजी आदा करणेत आली आहेत.ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची वाटखर्ची व डिपॉझीट रक्कम सोमवार दि.२६ मे २०२५ रोजी बँक खातेवर वर्ग करणेत आली आहे.

        गळीत हंगाम २०२५-२६ करीता बैलगाडी,बजाट,ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार यांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतूकीचे करार करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा