*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
घाणेगाव येथील हनुमान मंदिरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लाडू वाटप आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करून साजरी करण्यात आली
प्रारंभी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे म्हणाले कि आपला आदर्श जर छत्रपती संभाजी महाराज असतील तर आपण निर्व्यसनी राहणे सुद्धा ही आपली जबाबदारी आहे ज्यावेळेस एखादा व्यक्ती निर्व्यसनी व भांडणापासून आपल्याला दूर ठेवतो त्यावेळी त्याची त्याच्या कुटुंबाची व त्याच्या समाजाचे प्रगती होते त्यामुळे तरुणांनी कोणताही व्यसन न करता छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये अवलंब व्हावा आज घाणेगाव मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करत असताना मला विषय आनंद होतोय की ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाचा मार्कातील दर्जा उंचावत आहेत. शेती रासायनिक खतामुळे बिघडत असल्याचा कारणाने उत्पादन जास्त देत नाही त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळून त्यामुळे शेतीचा पोच सुधारेल व उत्पन्न देखील चांगले मिळेल याकडे सुद्धा आपण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असा आवाहन यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पीआय कुंदन गावडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केले.
यावेळी उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी तरुणांनी आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकटाला तर त्याच्यावरती मात करण्याची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांकडून घ्यावी संभाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला या संघर्षातून सर्वसामान्यांचे हक्काचे स्वराज्य टिकवून ठेवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले परिणामी मरण पत्करले परंतु कोणासही शरण गेले नाहीत किंवा स्वराज्याचे हानी होऊ दिल नाही हा आदर्श तरुणांनी घेणे गरजेचे आहे आपण आयुष्यामध्ये छोट्या जरी संकट आल तर त्यासाठी रडतो किंवा हतबल होतो परंतु संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी वेळोवेळी संकटाला तोंड दिलं हा आदर्श संभाजी महाराजांकडून घ्यावा. असे मत यावेळी आनंद काशीद यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमा वेळी घाणेगाव चे सरपंच उत्तम जाधव माजी जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष नितीन मोरे विजय चौरे विश्वंभर मोरे नंदकुमार मोरे घाणेगाव चे पोलीस पाटील भैया माळी आधी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी दिल्ली सर यांनी केले तर आभार रणजित पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी कैलास गोसावी दिनेश मोरे विकास शिंदे राजवीर काशीद आकाश जाधव यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा