Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ मे, २०२५

*माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर.... अक्कलकोट मधील मतदार काँग्रेसच्या पाठीशी* *कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागण्याची खासदार प्रणिती शिंदे यांच्या आवाहन.!...*

 


*सोलापूर प्रतिनिधी* 

    *आबिद- बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर…ही मतदार काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे खासदार प्रणिती शिंदे यांनी

सांगितले.

अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली.



यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आम्ही काँग्रेस सोबत आहोत असे सांगणारे आपल्याला अनेक फोन आले. अजूनही ७० टक्के मतदार काँग्रेससोबत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. मी कायम सोबत आहे. असा शब्द खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला. तसेच कोणतेही काम असू द्या माझ्याकडे थेट या, असे आवाहनही यावेळी केले.

यावेळी अक्कलकोट तालुक्यातील नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा