तहेसीन सय्यद
*रुखवत*
कला कौशल्य संस्कृतीचा सुंदर अविष्कारच....!
मांडवातला सुंदर कोपरा!खाऊचे पदार्थ, गृह सजावटीच्या.. हस्तकलेच्या.. आकर्षक वस्तू!नवरी आणि नात्यातल्या स्त्रियांची कला कृती ती .......
*रूखवत! नवरीच्या मनातला सुंदर कोपराच तो प्रेमळ भावनेने ओथंबलेला*!
हल्ली रूखवत देण्यामागील मुळ संकल्पनाच बदलली आहे. आता त्याला हुंड्याचेच स्वरूप प्राप्त झाले.*गाडी,फर्निचर, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागण्या वाढत चालल्या आहेत*.
*हा सर्व हुंडा देऊन जावयाला विकत घ्यायचे आहे का?*
*गरीब काय? आणि श्रिमंत काय? ..समस्त स्त्रीवर्गाची किंमतच कमी होत आहे इथे.. रूखवताला जे विकृत स्वरूप आले आहे ते बदलणे आवश्यक आहे.कुठेतरी थांबवायलाच हवे आहे. सुवर्ण मध्य साधायला हवा.*
रुखवत ही आपली सांस्कृतीक ठेव आपणच जपली पाहिजे. मुळ उद्देशाला विसरून चालणार नाही.समस्त स्त्री वर्गाच्या आत्मसन्माना साठी स्त्रियांनीच पुढाकार घेऊन मनातील हळवा कोपरा जपला पाहिजे.....
*घालमेल* या जीवाची समजू शकेल का कोणी .....???
क्षणात एका सप्तस्वरांनी मुकं व्हावं...
अन् इंद्रधनुनंही फिकं व्हावं
असेच झालेलं दिसत आहे या वैष्णवीच्या केस मध्ये. एकीकडे बेटी बचाव च्या घोषणा.... स्त्रियांना बरोबरीची वागणूक....?? खांद्याला खांदा देऊन लढणारी झाशीची राणी आज आत्महत्या करत आहे.किती दुर्दैव...
निष्पाप बाळाचा विचार न करता गेली ती....
यावरूनच कळतं एक सुशिक्षित मुलगी आपल्या भविष्याचा आपल्या मुलाचा विचार न करता आत्महत्या करते म्हणजे विचार करूनच हे पाहूनच अंगाला शहरा येतोय. तिच्या निष्पाप बाळाचं भविष्य काय ?आणि इतक्या लहान वयात एक क्षणात आई-वडिलांपासून ते बाळ दूर व्हावं पोरक व्हावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय? समस्त स्त्री जात आज या सावटाखाली वावरतच आहे श्रीमंताचे असल्यामुळे वाचा फुटत आहे किती ठिकाणी गरीब मुलींचे हाल आहेत... आणि हे कुठेतरी थांबायला हवं. जाहीर निषेध दर्शवला पाहिजे म्हणजे कुठेतरी वैष्णवीच्या आत्म्याला शांती मिळेल..
वैष्णवीला खरी श्रद्धांजली मिळेल
सय्यद तहेसीन मसुदअली
लातूर .9822220773
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा