*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज हे अजिंक्य योद्धे तर होतेच पण त्याचबरोबर उत्तम साहित्यिक ही होते संभाजी महाराजांनी नखशिकांत बुधभूषण नायिका भेद सात शतक असे चार ग्रंथ लिहिले संस्कृत इंग्रजी सह 16 भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नऊ वर्षांमध्ये रक्षण करून ते वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले होते असे मत श्याम कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम आशितोष तोंडसे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके राजेंद्र माने दिलीप निंबाळकर प्रशांत देशमुख संतोष सुरवसे मनीषा कोळी जयश्री जाधव प्रियांका शेळके माधुरी चव्हाण राजनंदिनी धुमाळ वैभव धुमाळ आनंदी धुमाळ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा