Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ मे, २०२५

*शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चा दहावीचा निकाल ९५.११ टक्के*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा निकाल ९५.११ टक्के लागला. संस्थेच्या ३३ शाखेतून २६९७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले. यापैकी २५६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.                                  

        जिजामाता कन्या प्रशालेची कु.पौर्णिमा संग्रामसिंह भांगे हिने ५०० पैकी ४९१ गुण व ९८.२० टक्के मिळवित प्रथम क्रमांक पटकावला. कु.सिफा सिकंदर तांबोळी जिजामाता कन्या प्रशाला अकलूज, व चि. ओंकार दत्तात्रय राऊत महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर या दोघांनी ४८५ गुण व ९७ टक्के मिळवीत विभागून द्वितीय क्रमांक पटकावला तर कु.आर्या गुरुनाथ कुलकर्णी जिजामाता कन्या प्रशाला अकलूज,चि. इंद्रनिल अनिल चव्हाण,चि. गौरांग उदय जामदार सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,या तिघांनी ४८४ गुण व ९६.८० टक्के मिळवीत विभागून तृतीय क्रमांक पटकावला. जिजामाता कन्या प्रशालेतील कु.आर्या गुरुनाथ कुलकर्णी हिने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले.                                         

       तसेच संस्थेच्या विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विझोरी, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,जिजामाता कन्या प्रशाला अकलूज,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरूड,श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव,श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शिवथर या सहा शाखांचा निकाल शंभर टक्के लागला.

        श्री गणेश विद्यालय पिंपळनेर ९९ टक्के ,श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर ९८.११ टक्के, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर ९८.८ टक्के, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर ९७.९८ टक्के,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे ९७.८७ टक्के,श्रीनाथ विद्यालय लोंढे मोहितेवाडी ९६.९७ टक्के, श्री पळशेश्वर विद्यालय पळसमंडळ ९६.७७टक्के , प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी ९६.६७ टक्के,श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली ९६.३६ टक्के, सदाशिवराव माने विद्यालय माणकी ९६.१५ टक्के,श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस ९६.४ टक्के ,मोरजाई विद्यालय मोरोची ९५.९३ टक्के,श्री चक्रेश्वर विद्यालय चाकोरे ९५.५६ टक्के,कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर ९५.२१टक्के,सदाशिवराव माने विद्यालय अकलूज ९४.८५ टक्के,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय नातेपुते ९४.५२ टक्के,कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती ९०.९१ टक्के, संत तुकाराम विद्यालय बोंडले ९०.७० टक्के,रामलिंग विद्यालय कुरबावी ८९.४७ टक्के,श्री शंभू महादेव विद्यालय उंबरे दहिगांव ८८.२४ टक्के,श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी ८६.९६ टक्के,श्री हनुमान विद्यालय लवंग ८६.८९ टक्के,श्री संभाजीबाबा विद्यालय इस्लामपूर ८४.२१ टक्के,श्री काळभैरवनाथ विद्यालय गुरसाळे ८३.८७ टक्के,अकलाई विद्यालय अकलूज ६९.३९ टक्के, मोहनराव पाटील विद्यालय बोरगाव ६६.६७ टक्के,रात्र प्रशाला अकलूज ५७.६९ टक्के निकाल लागला आहे. 

           या यशाबद्दल संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक मंडळ यासह विविध शाखेचे पदाधिकारी,मान्यवर आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा