Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ मे, २०२५

*धाराशिव जिल्हा शिवसेना ( शिंदे गट )सहसंपर्कप्रमुख पदी भगवान देवकाते यांची निवड*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

धाराशिव जिल्हा शिवसेना( शिंदे गटाच्या) जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी भगवान देवकाते यांची निवड करण्यात आली असून ही निवड केल्याचे पत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुंबई येथे सचिव संजय मोरे यांच्या अधिकृत स्वाक्षरी च्या निवडीचे पत्र देऊन त्यांचासन्मान करण्यात आला

     याप्रसंगी माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

     भगवान देवकाते हे उमरगा तालुक्यातील असून आगामी काळात जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक बळकट करणार असून आपण पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून त्यास मी पात्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले 



    भगवान देवकते यांच्या निवडीने कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला असून त्यांनी पक्षाचे कार्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केल्याने त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून त्यांची जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी निवड झाल्याचे कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा