Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ मे, २०२५

*अकलूज येथे महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साह साजरी*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथे महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था अकलूज व वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९४ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराची सुरुवात बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रामलिंग सावळजकर,सतीश कोरे व महालिंग राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

       अक्षयतृतीया व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिवशी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीची सुरवात चंद्रशेखर शेटे व सौ किर्ती शेटे या उभयतांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले व ढोल-ताशा वाद्याची मिरवणूक अकलूज शहरातून काढण्यात आली.श्री महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था ढोल ताशा पथक यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. यामध्ये समाजातील बहुसंख्य बंधु-भगिनी सहभाग झाले होता. ही मिरवणूक महादेव मंदिर येथून निघून शिवापूर पेठ,हनुमान मंदिर,आझाद चौक,जुने एसटी स्टँड मार्गे सदुभाऊ चौक,गांधी मार्गे शेवटी महादेव मंदिर बसवेश्वर पथ येथे मिरवणूकीची सांगता झाली ही मिरवणूक अकलूजकरांची लक्षवेधी ठरली.



शेवटी अकलूज वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.

             ही जयंती पार पडण्यासाठी त्रिंबक तात्या गुळवे,नागेश नष्टे,राजू आर्वे, आण्णा आर्वे,संतोष देवशेटे,उदय शेटे,चंद्रकांत शेटे,राजू गुळवे, संतोष गुळवे,बापू वैद्य,पिंटू वैद्य,पप्पू आंधळकर,महेश डिकोळे,पप्पू जठार,विलास क्षीरसागर,गणेश उंबदंड,सचिन गुळवे,शिवकुमार गुळवे,आदित्य आर्वे,सोमनाथ कथले,दादा राजमाने,गणेश नरूळे,सचिन कथले,डॉ चंदन सरताळे संदिप कुंभार विश्वनाथ बनगार,डॉ. निखिल आर्वे,कनाळकर यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा