Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ मे, २०२५

*सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का --माजी गृहराज्य मंत्री 'सिद्धराम म्हेत्रे' काँग्रेस सोडून घेणार हाती धनुष्यबाण?*

 


*सोलापूर प्रतिनिधी* 

    *आबिद- बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

ब्रेकिंग : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे या दिवशी काँग्रेस सोडणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे


सोलापूर : राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत. सोलापुरात ही आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून ते शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेणार आहेत.


ते मोठे नेते आहेत राज्याचे माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे. अक्कलकोट मतदारसंघाचे म्हेत्रे हे चार टर्म आमदार राहिले आहेत. एक वेळा ते राज्याचे गृहराज्य मंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते. तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.





शेवटी म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी महेश साठे, महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती. त्याच वेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय म्हेत्रे यांनी घेतला.

दरम्यान शनिवार 31 मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट मध्ये म्हेत्रे यांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा