अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेसाठी राज्य शासन तयार आहे.सर्किट बेंचची स्थापना निश्चितपणे कोल्हापूर येथेच होणार असे प्रतिपादन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे केले.
कोल्हापूर विमानतळावर खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले,यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही.आर.पाटील यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होणेसाठी मा.मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांचेसोबत बैठक घेऊन सर्किट बेंच स्थापनेचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे निश्चित स्थापन होणार.त्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरु असून मुख्य न्यायमूर्तिसोबत चर्चा केली आहे लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर,खा.धनंजय महाडिक,आ.अंमल महाडिक, आ.शिवाजीराव पाटील,भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव तसेच बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.तुकाराम पाडेकर,सेक्रेटरी ॲड.मनोज पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे,ॲड. संपतराव पवार,ॲड.धनंजय पठाडे,ॲड.शिवाजीराव राणे, ॲड.संकेत सावर्डेकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा