उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
*जस्मिन शेख यांना राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान*
एकता सेवाभावी संस्था, परभणी यांच्यामार्फत जस्मिन शेख यांना 'राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार' मुंबई येथील मराठी पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित समारंभात प्रदान करणेत आला. एकता सेवाभावी संस्थेमार्फत गेली २५ वर्षे समाजातील अनेक गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करणेत आला आहे.
सदरच्या कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार मा.विक्रम काळे, सिनेअभिनेते मा. अली खान, अभिनेत्री मा. उषा नाडकर्णी तसेच उद्योजक समूहातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मा. अजमत खान यांनी या कार्यक्रमाचे सुरेख संयोजन केलेले होते.
जस्मिन शेख या सांगली येथील श्री. राजाराम रंगलाल सारडा प्राथ. कन्याशाळा या ठिकाणी शिक्षिका म्हणून सेवेत आहेत. त्या समुपदेशक, व्याख्याती,रेकी हीलर,टैरो रीडर आहेत.सौ. शेख यांचे 'गट्टी मुळाक्षरांशी' हा बालकाव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे.नोंदणीकृत काव्यप्रेमी शिक्षक मंच शाखा जि. सांगली च्या अध्यक्षा आहेत. 'डायमंड वर्ड रेकॉर्ड' काव्यवाचन मध्ये त्यांचा सहभाग आहे. नैशनल युनिटी अवॉर्ड,राष्ट्रभूषण, हिरकणी, रणरागिणी, काव्य गौरव , राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.मुंलामधील वाचन आणि स्वलेखनासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. बालक पालक समुपदेशनाचे कार्य त्या करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा