*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा व पुण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सकाळपासून चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहर व उपनगरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, राज्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात याव्या, अशी मागणी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पावसाचा शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे राज्यातील ३५ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. उन्हाळी कांदा, कडधान्ये मातीमोल झाली आहेत. पावसाचा प्रामुख्याने अमरावती, जालना, जळगाव, नाशिक, चंद्रपूर व आहिल्यानगरमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा