शाैर्य इंद्रजीत पाटील
उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
शाैय पाटील ए.टी.एस परीक्षेत राज्यात आठवा जिल्ह्यात प्रथम
(वार्ताहर) - जि.प.प्राथमिक शाळा,रूई,ता.बार्शी,जि.साेलापूर येथील विद्यार्थी शाैर्य इंद्रजीत पाटील,इयत्ता-चाैथी हा ए.टी.एस प्रज्ञाशोध परीक्षा - २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात आठवा तर साेलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.त्याला ३०० पैकी २८२ गुण मिळाले आहेत.तर त्याचा धाकटा भाऊ सार्थक इंद्रजीत पाटील याच शाळेत शिकत असून या परीक्षेमध्ये इयत्ता दुसरीत त्याने २०० पैकी १५० गुण घेऊन गाैडगाव केंद्रात पहिला,साेलापूर जिल्ह्यात सतरावा तर महाराष्ट्र राज्यात चाेविसावा क्रमांक मिळवला आहे.या मुलांना घडविण्यात मुख्याध्यापक शस्त्रघ्नु घाेडके सर,सहशिक्षिका सुवर्णा डुरे मॅडम्,वंदना सुरवसे मॅडम्,महादेव सुरवसे सर यांचा माेलाचा वाटा आहे.ग्रामीण भागातून अशाप्रकारचे उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल या मुलांचे पालक सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत पाटील,आई साै.शुभांगी इंद्रजीत पाटील,आजाेबा कल्याण पाटील,आजी विमल पाटील यांना अतिशय आनंद झाला. त्यानी त्यांचे अभिनंदन करून अनेक शुभेच्छापर आशीर्वाद दिले.त्याचबरोबर मदन काळे,शंकर काळे,सतीश पवार,गावकरी मंडळी,सहकारी मित्रमंडळी यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष काैतुक केले व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सार्थक इंद्रजीत पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा