*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पारंपरिक पद्धतीने शेती करणारे माळशिरस तालुक्यातील शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीच्या तयारीत असायचे तोपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचला असल्याचे सुतोवाच कळायचे.
पण यावेळी अवकाळी पावसाची हजेरी संबंध महिन्या पूर्वी आपण सारेच अनुभवतो आहोत. बागायती फळे केळी आंबा इत्यादी फळांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. हा नासाडी करणारा पाऊस काही दिवसांत पाठ फिरवील अशी प्रत्येकाची मानसिकता होती.
परंतु संपूर्ण मे महिनाभर धुमाकूळ घालणारा पाऊस पाहून
सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या भाच्यांना आणि नोकर वर्गांना निमूटपणे माघारी फिरावे लागले.
अवकाळी पावसाने लग्न, सार्वजनिक पुजा, जयंती उत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले.
व्यापारी वर्गाला याचा मोठा फटाका बसला आहे. मे महिन्यात बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ असायची.पण अवकाळी पावसाने बाजार पेठेत म्हणावी तशी ग्राहकांची वर्दळ दिसत नाही. परिणामी व्यापार मंदावला असे व्यापाऱी वर्गातून बोलले जात आहे.
सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे शेतीतील भाजीपाला काढता येत नाही त्यामुळे भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक मंदावली असून त्याला ग्राहक ही उपलब्ध नाही पावसामुळे आवक कमी झाल्याने काही वेळा भाजी मंडईत भाजीपाला उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना तो भाजीपाला महाग दरात घ्यावा लागत आहे.
केवळ शेतीवर गुजराण असणाऱ्या बळीराजाची चिंता या अवकाळी पावसाने वाढवली आहे. दरवर्षी मृग नक्षत्राची चाहूल लागताच सजग होणारा शेतकरी यावेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता गोंधळून गेला आहे. ऐन पेरणीच्या दिवसांत संपूर्ण शेती जलमय होऊन शेताच्या बांधावरून पावसाचे पाणी वाहत आहे.
पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली तरच शेतकऱ्यांना पेरणी सुलभ होऊ शकते. पेरणी नंतर नियमित पाऊस पडला तरच शेती बहारेल अन्यथा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. हे विखारी वास्तव आहे
केव्हा केव्हा बळीराजा पेरणीपूर्वी वरून राजाची आगमन केव्हा होईल याची प्रतीक्षा करत असे मात्र आता बळीराजा चे वरूणराजा कडे साकडे घालण्याची वेळ आली आहे की राजा थांब आता आम्हाला पेरणी करून घेऊ दे? मात्र वरून राजाच्या आणि निसर्गाच्या मर्जी पुढे कोणाचे काही चालणार नाही हे मात्र त्रिवार सत्य आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा