*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील अखंड मराठा समाजाच्या आंदोलनानंतर शिंदे समितीकडून ज्या कुणबी नोंदणी मिळाल्या त्यामध्ये मौजे पोखरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील भगिनी सौ. वर्षाराणी सत्यवान दळवे ( सासरचे नाव सौ. वर्षाराणी संतोष वडणे) यांची कुणबी मराठा ची नोंद सापडली. त्यावर त्यांना इतर मागास प्रवर्गातील (OBC ) कुणबी नोंदीचा दाखलाही मिळाला.
त्या दाखल्याच्या अनुषंगाने कुंभारी ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील नव्याने झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीमध्ये सौ. वर्षाराणी सत्यवान दळवे ( सासरचे नाव सौ. वर्षाराणी संतोष वडणे) यांची सरपंच पदी निवड झाली. विराट आंदोलनानंतरची कुणबी मराठा ची पहिली महिला सरपंच होण्याचा मान पोखरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आमच्या बहिणीला मिळाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
त्यावेळी सकल मराठा समाज मोहोळ शहर व तालुका तसेच सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने आनंद व्यक्त केला व त्यांच्या मूळ गाव पोखरापूर येथे जल्लोष करण्यात आला. त्यांचे पोखरापूर येथील बंधू राजकुमार निवृत्ती दळवे(ग्रा. पं. सदस्य पोखरापुर) तसेच ॲड. श्रीरंग लाळे साहेब यांनी त्यांच्या दाखल्यासाठी विशेष प्रयत्न केलेले होते.
जय जिजाऊ, जय शिवराय !
लढेंगे, जितेंगे ; हम सब जरांगे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा