*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
हिंदुरुदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. त्याच शिवसेनेचा दि.१९ जून रोजी शिवसेनेला ५९ वर्ष पूर्ण होता आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुळजाभवानी मंदिरात देवीला विद्यीवापूजा करून महाआरती करत शहाजी महाद्वारासमोर शिवेसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल जाधव ,शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, शेतकरी सेनाप्रमुख गणेश नेपते,संजय लोंढे ,विक्रम कदम ,दुर्गेश कदम, रवी पाठक, मोहन भोसले ,संभाजी नेपते,
मयूर कदम ,गौरव साळुंखे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा