*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांच्या (मुन्नाभाई) विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनांची आणि मागण्यांची प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दखल घेतली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन तीव्र स्वरूप धारण करत आहे. 20 जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे *जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आत्मदहन करणार आहेत,* अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशावरून घेण्यात आला आहे.
*आंदोलनामागची पार्श्वभूमी:*
तालुक्यात *डिग्री नसलेले तथाकथित डॉक्टर* विविध औषध उपचार करीत असून, अनेक नागरिकांची फसवणूक करत आहेत. याविरोधात अनेकवेळा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आंदोलन करत आहे. आरोग्य प्रशासनाने वेळोवेळी कारवाईचे लेखी आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
*धक्कादायक घटना :*
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील *डॉ. राजेंद्र लबडे* यांच्यावर बोगस दवाखाना चालवत असताना उपचारासाठी आलेल्या *२४ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.* या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही संबंधित डॉक्टर पुन्हा क्लिनिक चालवत असल्याची माहिती समितीने दिली असून, त्यामागे प्रशासनातील काही व्यक्तींचा आशीर्वाद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
*आत्मदहनाचा इशारा :*
या सगळ्या प्रकारांवर तात्काळ कारवाई न झाल्यास *२० जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.* यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, त्यावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे.
*प्रशासनाची भूमिका अजूनही धूसर :*
*प्रशासनाकडून या प्रकारावर अजून ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २० जून रोजी होणाऱ्या या आत्मदहन आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.*
आज आंदोलन स्थळी तालुका आरोग्य अधिकारी व तुळजापूरचे पीआय मांजरे साहेब यांनी काल केलेली कारवाई व याच्यापुढे दररोजच कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचे पत्र देण्यात आले त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे महिला पुरुष व दिव्यांबद्दल मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या ताकतीमुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणखी एक आंदोलन यशस्वी झाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा