*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- आरक्षणाचे जनक, लोक कल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून बावडा येथील विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात साजरी करण्यात आली.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जयंती साजरी करत असताना सामाजिक व जेष्ठ कार्यकर्ते भीमराव कांबळे, अनिल कांबळे, भन्ते गौतम जगताप यांनी छ.शाहू महाराज यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सिद्धार्थ कांबळे, विकास कांबळे, नागेश गायकवाड, अनिल झेंडे, अखिल कांबळे, विशाल कांबळे, मुकुंद खरात, गणेश कांबळे, विकास गायकवाड, अमोल कांबळे, सुयश कांबळे, राजरत्न कांबळे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा