*यशवंतनगर---प्रतिनिधी*
*नाझिया मुल्ला*
*टाइम्स 45 न्युज मराठी
महर्षि संकुल यशवंतनगर येथे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी सत्कार व वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील संस्थापक अध्यक्ष सयाजीराजे मित्र मंडळ अकलूज, सुषमा संतोष महामुनी प्र. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माळशिरस व सभापती अॅड.नितीनराव खराडे उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचे स्वागत महर्षी बाल वाद्य वृंदा कडून स्वागत गीताने करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकात माळशिरस तालुक्याचे नंदनवन करण्यात सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्याबरोबर सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची भूमिका मांडली.
सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचा सन्मान समारंभ व्यासपीठावर संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देणाऱ्या देणगीदारांचा सन्मान संकुलाच्या वतीने करण्यात आला.
भूमिका कारमकर या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवन कार्यावर शब्दांजली वाहिली. प्रशालेतील सहशिक्षिका सोनाली चौधरी यांनी आपल्या मनोगतातून अनेक लहान मोठे प्रसंग रेखाटन करत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
संकुलातील माध्यमिक शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा व क्रीडा विभागात नैपुण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा सन्मान समारंभ सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील व सुषमा संतोष महामुनी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रशालेतील गुणवंत विद्यार्थिनी संस्कृती म्हमाणे हिने प्रशालेविषयी असणारी आस्था मनोगतातून व्यक्त केली. माता पालक सुचेता गायकवाड यांनी प्रशाला व शिक्षकांविषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
प्रमुख अतिथी सुषमा महामुनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळून वाचन संस्कृती रुजवण्याचे आवाहन केले.
सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रशालेत प्राथमिक आरोग्य केंद्र यशवंतनगर यांचे मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. अमोल आव्हाड वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक विलास झुरळे ,आरोग्यसेविका श्रीमती सुप्रिया मोरे ,श्रीमती कीर्तके ,श्रीमती गिरीजा चाबुकस्वार ,श्रीमती कोमल कन्हेरे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शुभम राजमाने, प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, अनिल जाधव ,विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका अनिता पवार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सारे जहासे अच्छा समूहगीताने करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा