*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापूर ता. तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व इतर कामे बोगस व निवीदेच्या रकमेपेक्षा डबल खर्च दाखवुन महाराष्ट्र शासनाची व महामंडळाची फसवणुक केली असुन याबाबत संबंधीत अधिकारी, ठेकेदार व इतर यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नसल्याने दिनांक 03/06/2025 रोजी बस स्थानक समोर बोंब मारो आंदोलन करत असलेचा इशारा महाविकास आघाडी व घटक पक्ष तुळजापूर तालुका व शहर च्या वतीने कॅमेरा बंद आहे प्रत्यक्ष तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
श्री क्षेत्र तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडुन तेथे जे नविन बसस्थानक करण्यात आले असुन सदरील काम चालु झाल्यापासुन अत्तापर्यंति निकृष्ट दर्जाचे, बोगस व अंदाज पत्रकाप्रमाणे काम न करता तसेच मुळ अंदाजपत्र निविदाच्या डबल खर्च दाखवुन एस.टी. महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची फसवणुक करुन कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत आपण योग्यती चौकशी करुन संबंधीत अधिकार ठेकेदार यांच्याकडुन अपहार झालेली रक्कम वसुल करण्यात यावी तसेच सदर काम हे वाळु न वापरता दगडापासुन बनविलेले माती मिक्स टस्ट वापरुन बांधकाम करयात आलेले आहे. त्याबाबत वारंवार निवेदन दिले होते. सदर निवेदनावर आज तागायत कोणतीही कार्यवाही झाले नाही तसेच वरील विषयाच्या अनुषंगाने तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असुन याची चौकशी करुन सर्व संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत वारंवार सर्व संबंधीतांना तक्रारी निवेदन देवुनही अद्याप संबंधीतावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने दिनांक 03/06/2025 रोजी लोकशाही मार्गाने जुने बसस्थानक आवारात बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे या निवेदनावर धीरजभैया कदमपाटील. अमोलजी कुतवळ. ऋषिकेश मगर. श्याम पवार. सुनील जाधव. सुधीर कदम .दीपक थोरात. नरेश पेंदे .किरण यादव .आकाश शिंदे . अजयभैय्या साळुंखे .प्रदीप मगर. अक्षय धनंजय कदम. अनमोल साळुंखे. नागनाथभाऊ भांजे . राहुलजी खपले .उत्तमनाना अमृतराव .महादेव देवकर .प्रदीप मगर . इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहे
माहीतीस्तव :-
1. मा. पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन तुळजापूर.
2. मा. विभागीय नियंत्रक, रा.प. धाराशिव मार्फत आगार प्रमुख रा. प. तुळजापूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा