*शिवभक्त --सतीशराव खोपडे*
*तुळजापूर..
6जून रोजी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा आदरणीय श्री संभाजीराजे छत्रपती, आदरणीय महाराणी संयोगिताराजे यांचे प्रेरणेने व अखिल भारतीय श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, रायगड यांचे अथक प्रयत्नाने दरवर्षी मोठया जल्लोष व शिवभक्तीने साजरा केला जातो. या सोहळ्यात तुळजापूकरांना रायगडाची गडदेवता आई शिर्काई देवीला साडीचोळी हे महावस्त्र व अभिषेकप्रसंगी राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, होळीच्या माळावरील मूर्ती, राज्याभिषिक्त चांदीची मुख्य मूर्ती, शिवाजी महाराज यांची समाधी व श्री जगदीश्वर यांना अर्पण करण्यात येत असलेल्या कवड्याच्या माळा, तुळजाभवानी मातेचे कुंकू व पुजासाहित्य अर्पण करण्याचा मान तुळजापूरकरांना मिळालेला आहे, त्यानुसार आज तुळजाभवानी मंदिरात आज मंदिर व्यवस्थापक श्री विश्वास परमेश्वर, श्रीकांतदादा कदम, गणेश पुजारी, ज्ञानेश्वर गवळी, अनिल आगलावे, सुरज बागल, महेश शिंदे, शेखर फुगारे यांचे हस्ते अखिल भारतीय श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती रायगडचे सदस्य व मानकरी श्री सतीश खोपडे व अभियंता कु. श्लेषा खोपडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले, दि. 6जून रोजी हे सर्व साहित्य रायगडावर राणीसाहेब संयोगिताराजे यांचेकडे देण्यात येणार आहे, यावर्षी 351 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केलेले आहे. 🙏🏻🙏🏻🚩🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा