Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ जून, २०२५

*अखेर... "नीरज उबाळे*यांनी अकलूज पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला* *कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी* *आपन कटीबद्ध रहाणार* - *नीरज उबाळे*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन काही दिवसात माळशिरस तालुक्यात होत आहे.त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

           निरज उबाळे यांनी पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर काम केलेले आहे.त्यामध्ये गुन्हे अन्वेषण आणि भ्रष्टाचार विरोधी कारवाईचा व्यापक अनुभव आहे.यापूर्वी त्यांनी पुणे व मुंबई येथे अँटी करप्शन ब्युरो आणि क्राईम ब्रँचसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये काम पाहिले असून, सांगली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारीने पार पाडली आहे.




*चौकट*

"वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असून,कुठल्याही प्रकारचा अनुचित घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.तसेच नागरिकांनी पोलीस खात्यास सहकार्य करावे,"असे आवाहन उबाळे यांनी यावेळी केले.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काळात पोलीस यंत्रणा अधिक कार्यरत राहणार असून,शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस विभाग सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.


*नीरज उबाळे*

पोलीस निरीक्षक,

अकलूज पोलीस स्टेशन अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा