Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ जुलै, २०२५

*श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश..* *अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाले गोल रिंगण*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा, 


संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आज सकाळी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश झाला.जिल्हा प्रशासनाच्यावतीने २ जेसीबीच्या साह्याने पालखीच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचा गोल रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

      पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रवेशापूर्वी तुकारामांच्या पादुकांना निरानदी पात्रात शाही स्नान घालण्यात आले.सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जि.प.मुख्य कार्य. अधिकारी कुलदीप जंगम, मदनसिंह मोहिते पाटील,अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर प्रांताधिकारी विजया पांगारकर,तहसीलदार सुरेश शेजुळ आदीनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

           यावेळी पुणे जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातून पालखीची सूत्रे सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.

 सकाळी ९-५० वाजता पालखीचे अकलूज येथे गांधी चौकात आगमन झाले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,सौ नंदिनीदेवी मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,सत्यप्रभादेवी मोहिते पाटील,माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील, अकलूज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदींनी पालखीचे स्वागत केले. गांधी चौकातून पालखी सोहळा सकाळी १०-३० वाजता सदुभाऊ चौकात आगमन झाले.   

सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीने १०-३० वाजता प्रवेश केला. पालखीची मानाची आरती व पाद्यपूजा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व सौ. ऋतुजादेवी मोहिते पाटील,युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते झाली. सकाळी ११:०८ वाजता रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला. सुरुवातीस पताकाधारी,तुळशी व हांडा धारक महिला,विणेकरी, टाळकरी यांनी धावत एक फेरी पूर्ण केली व सोहळ्यातील दोन्ही अश्वांची पूजा करण्यात आली. त्यानंतर बाभुळगावकरांचा देवाचा अश्व व पाठीमागे मोहिते पाटील यांच्या स्वारधारक अश्वाने रिंगणात धावत प्रत्येकी तीन फेऱ्या पूर्ण केल्या.यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,नंदिनीदेवी मोहिते पाटील,आ.रणजीतसिंह मोहिते पाटील,सत्यप्रभादेवी मोहिते पाटील,खा.धैर्यशील मोहिते पाटील,सौ.शितलदेवी मोहिते पाटील,माजी मंत्री राजेश टोपे, खा.कल्याणराव काळे,खा. भास्कर भगरे,डॉ.धवलसिंह मोहिते पाटील,स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील,माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील यांचे सह मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य,प्रशासनातील विविध मान्यवर प्रमुख उपस्थित होते.




           रिंगणा नंतर वारकऱ्यांनी मैदानावर पारंपारिक खेळ खेळले तर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला.पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर मुक्कामासाठी विसावला.दिवसभर चौका चौकात भारुड,किर्तनाने रंगत आणली.अकलूज परिसरातील विविध मंडळांनी, संस्थांनी, व्यापाऱ्यांनी वैष्णवासाठी नाष्टा, फळे व अन्नदानाची सुविधा पुरवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा