पन्हाळा --प्रतिनिधी*
*प्रा.- विश्वनाथ पाटील*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र (बी.एड.) महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
यानिमित्त सृजनशीलता व व्यक्तिमत्व विकास विभागाचे प्रमुख प्रा.ए.जी.लोकरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा.श्रीमती जी.के. मुजावर,वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर,ग्रंथपाल सूरज पवार, सेवक तानाजी मोहिते आणि संजय माने गोंधळी यांच्यासह विद्यार्थी - शिक्षक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा