*पन्हाळा-- तालुका प्रतिनिधी*
*विश्वनाथ. पाटील*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद परीक्षेत विश्वनाथ पवार केंद्रात प्रथम तर नूतन प्रकाश सुतार आणि प्रतिज्ञा नूतन सुतार या मायलेकिंनी विभागून दुसरा क्रमांक पटकावला आहे
कोडोली ( ता . पन्हाळा, जि. कोल्हापूर ) :/ शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात( बी. एड. कॉलेज ) सुरू असलेल्या आजीवन अभ्यासक्रमांतर्गत ' ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद ' अभ्यासक्रम परीक्षेत विश्वनाथ राजाराम पवार यांनी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या परीक्षेत नूतन प्रकाश सुतार आणि प्रतिज्ञा नूतन सुतार या मायलेकिंनी विभागून केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या केंद्राचा १०० टक्के निकाल लागला आहे. प्रकल्प अधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी ही माहिती दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील , अध्यक्षा पद्मजा पाटील आणि विश्वस्त विनिता पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
या महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद , ग्रंथालय व्यवस्थापन आणि बालवाडी हे तीन अभ्यासक्रम सुरू असल्याचे सांगून प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले ," तीन महिने व सहा महिने या मुदतीचे हे अभ्यासक्रम आहेत. याचे प्रवेश शुल्क अत्यल्प आहे. ज्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी महाविद्यालयात येवून नावनोंदणी करावी. ९९७५९७८०७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा