*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
आत्तापर्यंत आपण ऐकलं होतं की या मंत्र्यांनी या आमदाराने या खासदाराने एवढ्या कोटीचा तेवढ्या,एवढ्या लाखाचा,तेवढ्या लाखाचा,घोटाळा केला.... घोटाळा केला पण हे सगळं आपण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घोटाळा झाल्याचे पाहिले आहे.
परंतु पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असणारे करकंब व सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या करकंब गावामध्ये वर्षाला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा होतो आणि त्याच्याकडे प्रशासन व संबंधित अधिकारी मुद्दामून कानाडोळा करत असतात.
तुम भी जिओ... और हमे भी जीने दो....
या म्हणी प्रमाणे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमंत होऊन गावाला आलेल्या कोट्यावधी रुपये हडप्प करतात. याचं कारण असं आहे की, काही दिवसांपूर्वी करकंब मधील काही शेतकऱ्यांनी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांची भेट घेऊन करकंबमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला हे ऐकून अतुल खूपसे यांनी डोक्यालाच हात लावला....
याचा झालं असं की, मौजे करकंब तालुका पंढरपूर या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचे दोन पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याची कामे मंजूर झाली आहेत व याचे काम ठेकेदारांनी सुरू केले परंतु अतिशय निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व याची माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून घेतली अधिकाऱ्यांनीही अर्धवट माहिती दिली
करकंब येथील जुन्या पाझर तलावाची साठवण तलावात रुपांतर करणे तलाव क्रमांक 5 ची रक्कम रुपये 4 कोटी 39 लाख 33 हजार 444 एवढे बिल काम अर्धवट असताना ऑक्टोबर 2024 महिन्यात बिल उचलण्यात आले आहे. करकंब पाझर तलावाची साठवण तलावात रूपांतर करणे तलाव क्रमांक 6ची रक्कम रुपये 4 कोटी 85 लाख 41 हजार 555 एवढी रक्कम उचलण्यात आली आहे. सदरची कामे अर्धवट स्वरूपात असताना संगणमत करून सदरचे करोडो रुपये हडपले, पाणी अडवण्यापेक्षा पैसे अडवण्यामध्ये मातब्बर असणाऱ्या गावच्या राजकीय पुढार्यांनी हे उद्योग केला आहे..
नंतर जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मागितली त्यांनीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माहिती देण्यास टाळाटाळ केली...
व कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या लक्षात आली की खरोखरच या करकंब मधील कष्टकरी गोरगरीब जनतेच्या पैशाची लूट होत आहे म्हणून दिनांक 12 जून 25 रोजी अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता व जलसंधारण विभाग येरवडा पुणे येथे जनशक्ती संघटनेच्या वतीने व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने हलगी नाद आंदोलन करण्याचे ठरविले आहे या निरडवलेल्या प्रशासनाला व अधिकाऱ्यांना याची जाग येईल व या मनमानी कारभाराला चाप बसेल व शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा