*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
🚜 चक्का जाम आंदोलन धाराशिव 🚜
विधानसभा निवडणूक काळात फसव्या घोषणांची खैरात करत सत्तेत आलेल्या महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकप्रिय आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख नंदूभैय्या राजेनिंबाळकर. आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्यामलताई वडणे पवार यांच्या नेतृत्वाखाली धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव शहरातील शिंगोली विश्रामगृहासमोर आज जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
शेतकर्यांच्या सोयाबीन व इतर शेतीमालाला हमीभाव, बी-बियाणांवर अनुदान तसेच सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकर्यांनी चक्क ट्रॅक्टर, पेरणी यंत्र घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला.
आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांसह शेतकर्यांनी भाजपा सरकारच्या फसव्या घोषणांच्या निषेधार्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महाराष्ट्रासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तरी देखील या सरकारने शेतकर्यांची कसलीही दखल घेतली नाही. उलट जाती-जातीमध्ये भांडणे लावून देण्याचे काम हे सरकार करीत असल्याचे यावेळी अनेकांनी आपल्या भाषणात सांगितले.
तसेच शेतकर्यांना कर्जमुक्ती, शेतकरी सन्मान योजनेतून 15 हजार रुपये, लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरुन 2100 रुपये, 45 हजार गावात पाणंद रस्ते, शेतकर्यांनी खरेदी केलेल्या खतावरील राज्य सरकारची जीएसटी अनुदानाच्या स्वरुपात परत करण्याबरोबर 1 रुपयांत पीकविमा वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देण्याबरोबर शेतीला 24 तास वीज पुरवठा, शेतीमालाला हमीभाव, खते व बी-बियाणांचे दर नियंत्रित ठेवणे यासारख्या हजारो घोषणांचा पाऊस पाडणार्या सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनात सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर,भारत इंगळे,महिला आघाडी शामल वडणे, मनीषा वाघमारे,जिल्हा संघटक दीपक जवळगे, दिलीप पाटील,शिवसेना सचिव प्रवीण कोकाटे, मा. नगराध्यक्ष दत्ता बंडगर,उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,प्रदीप मेटे,जितेंद्र कानडे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, जग्गनाथ गवळी, सचिन काळे,अमोल बिराजदार शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राहुल खपले,विश्वजीत जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे,मनोहर धोंगडे, दिनेश बंडगर,संग्राम देशमुख, शाम जाधव, राजेश्वर पाटील संजय खडके , नगरसेवक राजाभाऊ पवार,राणा बनसोडे, तुषार निंबाळकर सिद्धेश्वर कोळी, गणेश खोचरे,पंकज पाटील,राकेश सूर्यवंशी, अभिराज कदम, बंडू आदरकर, पांडुरंग माने, वैभव वीर, संतोष पुदाले, मोईन पठाण, संजय खडके, सुनील गरड,मनोज पडवळ, सह्याद्री राजेनिंबाळकर, अजिंक्य राजेनिंबाळकर, गफुर् शेख, शोकत शेख,जगदीश शिंदे, संदीप शिंदे, अजित बाकले,गणेश साळुंके, मिलिंद पेठे, अभिजित देशमुख, संदीप शिंदे, संजय बाबा देशमुख,विशाल जमाले,वैभव वीर, पांडुरंग माने,शिवाजी देशमुख, कृष्णा मोरे, बाळकृष्ण पाटील, dr कानडे सर,मंगेश काटे,अक्षय खळदकर,पंडित देशमुख, गोविंद चौधरी, मेघराज मुंडे,अबरार कुरेशी, अक्षय जोगदंड,सतीश लोंढे, प्रदीप साळुंके, परवेज भाई,प्रशांत जगताप, हनुमंत देवकते, पांडू भोसले,प्रवीण केसकर,गणेश राजेंनिंबाळकर,अविनाश शेरखाने, कलीम कुरेशी, असद रजवी, अण्णा तनमोर, शाम नाना खबाले, आण्णा दूधभाते,प्रथ्वीराज खोचरे,सरदारसिंग ठाकूर, नवनाथ जगताप, अनमोल साळुंके चेतन बंडगर , मारुती देशमुख,मनोज मगर, महेश मगर,दिनेश हेड्डा,अंकुश मोरे, बळीराम कांबळे, आश्रुबा बिक्कड,विकास जाधव,छोटा साजिद,अबरार कुरेशी, गणेश राजेनिंबाळकर, किसन भिसे,नवनाथ तवले, शाकीर शेख, रामेश्वर जमाले, सुनील शेळके,निर्भय घुले,कुलदीप घावटे,संदीप शिंदे शिवसैनिक व शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा