Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ जून, २०२५

*"विजयसिंह मोहिते पाटील" वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप*

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री .विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धैर्यशील मोहिते पाटील मित्र परिवार, मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र, हिंदू खाटीक सामाजिक केंद्र, जय भवानी प्रेस, भानुदास खडके फटाका मार्ट, स्वामी विवेकानंद मंडळाचे शिवगर्जना ग्रुप, स्वामी समर्थ ग्रुप, साहिल स्पोर्ट्स अकलूज यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहादूर गट (बिजवडी) या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या,पाटी,कंपास, चित्रकला वहया,रंगपेटी,वॉटर बॅग, टिफिन बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बिजवडी गावच्या वतीने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या शिंदे तसेच महेश खडके, गणेश खडके यांच्या शुभहस्ते विजयदादांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर ननवरे, अक्षय मोहिते, बिजवडी गावचे उपसरपंच दत्तू जाधव, पिंटू मदने, गणेश नागरगोजे, श्रावण खडके,प्रतीक खडके, धनराज पाटसकर, पवारवस्ती शाळेचे नितीन बनकर रावबहादूर गट शाळेचे श्रीकांत राऊत, अजमिर फकीर शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा