Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ जून, २०२५

चैतन्य विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटपाने उत्साहात साजरा.

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

-----नीरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व श्री सु गो दंडवते कनिष्ठ महाविद्यालयाचे सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षात नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पे देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 

   याप्रसंगी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्रीकांत दंडवते, खजिनदार मगनदास क्षीरसागर, संचालक शामराज दंडवते, माजी मुख्याध्यापक व प्रशाला समितीचे अध्यक्ष धनंजय दुनाखे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गुलाबाची फुले मान्यवरांच्या हस्ते देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 

     त्याचबरोबर सर्व पालकांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना शाळेतील नवीन शैक्षणिक धोरण, शाळेची शिस्त, शाळेतले सर्व उपक्रम याची माहिती मुख्याध्यापक गोरख लोखंडे सर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख लावंड सर यांनी केले. अंकुश पडळकर सर यांनी आभार व्यक्त केले. 

     विद्यार्थांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. शाळा ही सुखाची सरीता, ज्ञानाची अखंड गंगा व भाग्याची देवता असल्याचे प्रचिती आली. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाचे संस्था पदाधिकारी यांनी इ.१० चा निकाल चांगला लागले बद्दल अभिनंदन केले व कौतुक केले.





फोटो - नीरा नरसिंहपूर येथील येथील चैतन्य विद्यालय व श्री सु गो दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव संपन्न.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा